Kolhapur News : काेल्हापूरात बाहेरहून लाेक आले हाेते का ? आज हाेणार महत्त्वपूर्ण तपास, एसपींची माहिती (पाहा व्हिडिओ)

बुधवारी शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले हाेते.
kolhapur, kolhapur news,
kolhapur, kolhapur news, saam tv

Kolhapur News : काेल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदाेलनात शांतता बिघडविण्याचे काम करणा-यांचा आज संबंधित घटनास्थळावरील विविध दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून करणार असल्याची माहिती एसपी महेंद्र कमलाकर पंडित (sp kamlakar pandit) यांनी आज (गुरुवार) आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या घटनेत तीन पाेलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल केले आहेत. सुमारे 36 जणांना अटक केल्याचे सांगत तीन जण अल्पवयीन असल्याचे पंडित यांनी नमूद केले. त्यांना बाल न्यायालयात दाखल केले जाईल असे पंडित यांनी स्पष्ट केले.(Maharashtra News)

kolhapur, kolhapur news,
Sangamner News : मला माहित आहे माेर्चात काेण हाेते, सावध राहा ! त्यांचा हेतु चांगला नाही : बाळासाहेब थाेरात (पाहा व्हिडिओ)

पोलीस अधीक्षक महेंद्र कमलाकर पंडित म्हणाले ज्यांनी स्टेटस ठेवले ते काॅलेजला जाणारे तरुण आहेत. एकमेकांच्या स्टेटसवरुन समाज माध्यमातून स्टेटस ते ठेवत असतात. युवकांनी दिलेल्या माहितीनूसार त्यांना इंटरनेटवरुन संबंधित व्हिडिआे मिळाले त्यातून त्यांनी ते घेत स्टेटस ठेवले. संबंधितांचे माेबाईलचे परीक्षण करीत आहाेत. त्याबाबत सखाेल तपास करीत आहाेत.

kolhapur, kolhapur news,
Shivrajyabhishek Din : ठरवलं तर रायगड किल्ला ताब्यात घेऊ; लाखाे शिवप्रेमींच्या साक्षीने संभाजीराजे गरजले (पाहा व्हिडिओ)

दरम्यान शहर पुर्वपदावर आले आहे. काेल्हापूरात पाेलिसांची जादा कुमक उपलब्ध झाली आहे. वडंगे येथील घटनेनंतर पाेलिसांनी कार्यवाही केली आहे. संशयितांचा तपास सुरु आहे. सध्या गावात पाेलिस बंदाेबस्त असून शांततापूर्ण वातावरण आहे.

कालच्या आंदाेलनात बाहेरच्या लाेक आले हाेते का ? या प्रश्नावर एसपी म्हणाले आज घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील. त्यानंतर सखाेल तपास केला जाईल. दरम्यान नागरिकांनी काेणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन एसपी पंडित यांनी केले. ते म्हणाले आक्षेपार्ह पाेस्ट समाज माध्यमात आल्यास त्याचा शाेध घेण्यासाठी देखील (kolhapur) पाेलिस यंत्रणा सतर्क आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com