kolhapur Crime News
kolhapur Crime NewsSaam TV

Kolhapur News : संतापजनक! खासगी क्लासमध्ये ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ७३ वर्षीय आरोपीला अटक

Kolhapur Crime News : खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात घडली.
Published on

रणजित माजगावकर, साम टीव्ही

खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. श्रीपती भोसले, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

kolhapur Crime News
Panvel Crime News : अशी लेक नकोच! मुलीनेच १० लाखांत दिली आईच्या हत्येची सुपारी; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीपती हा राधानगरी परिसरात खासगी क्लास घेतो. पीडित मुलगी देखील त्याच्याच क्लासमध्ये शिक्षण घेते. जुलै महिन्यापासून आरोपी हा पीडितेचे लैंगिक शोषण करत होता. पीडितेला एका खोलीत नेऊन तो तिच्यावर अत्याचार करायचा. याबाबत कुणालाही सांगितल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी देखील द्यायचा.

आरोपीचे कृत्य वाढतच असल्याने पीडिता प्रचंड घाबरली होती. ती ट्युशनला जाण्यास नकार देत होती. आईने तिला याबाबत कारण विचारले असताना घडलेला सर्व प्रकार पीडितेने आईसमोर कथन केला. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे कळताच पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला अटक केली.

दरम्यान, आरोपी श्रीपती याच्यावर बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी ट्युशनमध्ये अवघ्या ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं कळताच परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागमी परिसरातील नागरिक करीत आहे.

छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना भररस्त्यात चोपलं

मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना नागरिकांनी भररस्त्यात दिला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. नाशिकमधील निफाड तालुक्यात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काही टवाळखोर तरुण शाळेच्या गेटवर तसेच शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढत होते. यावर नागरिकांनी संताप व्यक्त करत रोडरोमियोंना भररस्त्यात चोप दिला.

kolhapur Crime News
Yavtmal News : गणरायाचा प्रसाद घ्यायला गेला अन् घात झाला; तरुणाचा जागेवरच गेला जीव, यवतमाळमध्ये काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com