जोतिबाच्या पुजाऱ्यांची भाविकाला मारहाण, मद्यपींनी धिंगाणा घातल्याचा आरोप

Chaos at Jyotiba Temple: कोल्हापुरातील जोतिबाच्या मंदीरात राडा झाला. चक्क पुजाऱ्यांनीच हुल्लडबाजी करणाऱ्या भाविकांना बेदम चोप दिला आहे. या प्रकरणी आता पुजारी आणि भाविकांवर गुन्हा दाखल झाला आहे. मंदीरातच झालेल्या मारहाणीवरचा हा खास रिपोर्ट पाहूया..
Violence erupts inside Jyotiba Temple in Kolhapur as priests allegedly assault devotees during aarti.
Violence erupts inside Jyotiba Temple in Kolhapur as priests allegedly assault devotees during aarti.Saam Tv
Published On

ही तुंबळ हाणामारी पाहा...हा राडा झालाय तो चक्क मंदीर परिसरात आणि ते ही महाराष्ट्राचं कुलदैवत, लोकदैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मंदिरात....

कोल्हापुरच्या या मंदीरात सासनकाठी मानकऱ्यांसोबत आलेल्या काही तरुणांनी आरती सुरू असताना हलगी वाजवून गोंधळ केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलाय. त्यांना शांतता ठेवण्यासाठी वारंवार सांगूनही एेकत नसल्यानं काही पुजारी त्यांच्यावर तुटून पडले. एका पुजाऱ्याने तर भाविकाच्या डोक्यावर नारळाने प्रहार केला.

मारहाण झालेले हे भाविक परिते गावचे होते. या घटनेनंतर आम्ही कमीपणा घेत माफी मागितली आहे. मात्र गावातील कोणीही मद्यपान करुन असा प्रकार केला नसल्याचा दावा सरपंचांनी केलाय.दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवत सोमवारी संपूर्ण ज्योतिबा डोंगरावरील दुकाने बंद ठेवण्यात आलीयेत. तर कोडोली पोलिसांनी 15 पुजारी आणि 15 भाविकांवर गुन्हा दाखल केलाय.

जोतिबा मंदिरात येत्या एक एप्रिलला मुख्य यात्रेचा दिवस आहे. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातूनही भाविक आणि मानाच्या सासनकाठी मंदिराच्या परिसरात येत असतात. दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

पुजाऱ्यांनीही कायदा हातात न घेता हुल्लडबाज करणा-यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं, असा सूर उमटतोय. तर काही जण धार्मिकस्थळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना धडा शिकवणं गरजेचं आहे, असे मत व्यक्त करत आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे भाविकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांच्या चौकशीत काय सत्य समोर येतंय ? ते पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com