धक्कादायक; महाप्रसाद खाल्ला अन्...; 100 ते 125 नागरिकांची प्रकृती बिघडली, घटनेनं खळबळ

Mass Food Poisoning At Datta Jayanti: गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात दत्त जयंती महाप्रसादातून झालेल्या विषबाधेमुळे 100 पेक्षा जास्त नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Over 100 villagers from Sambare, Gadhinglaj were hospitalized after suspected food poisoning from Datta Jayanti Mahaprasad.
Over 100 villagers from Sambare, Gadhinglaj were hospitalized after suspected food poisoning from Datta Jayanti Mahaprasad.Saam Tv
Published On
Summary
  • सांबरे गावात दत्त जयंती महाप्रसादातून विषबाधेची घटना उघडकीस आली आहे.

  • सुमारे 100 ते 125 नागरिक अचानक आजारी पडताच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • लहान मुले आणि महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असून उपचार सुरू आहेत.

  • आरोग्य विभागाने नमुने तपासणीसाठी घेतले असून कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. आता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे 100 ते 125 नागरिकांना अचानक तब्येत बिघडण्याची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Over 100 villagers from Sambare, Gadhinglaj were hospitalized after suspected food poisoning from Datta Jayanti Mahaprasad.
Pune Land Scam Case: पुणे पोलिसांकडून शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती; महत्त्वाचे कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

या घटनेत लहान मुले आणि महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असून नेसरी ग्रामीण रुग्णालय तसेच गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात पीडितांवर उपचार सुरू आहेत. अनेकांना उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्याची लक्षणं दिसून आली आहेत.

Over 100 villagers from Sambare, Gadhinglaj were hospitalized after suspected food poisoning from Datta Jayanti Mahaprasad.
BJP Vs Shiv sena: बोर्ड फाडले, एकमेकांना घातल्या लाथा; वरळीत भाजप-ठाकरे सेनेत का झाला राडा?

आरोग्य विभागाने तातडीने पथक पाठवून महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून विषबाधेचं नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावात चिंतेचं वातावरण असून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Over 100 villagers from Sambare, Gadhinglaj were hospitalized after suspected food poisoning from Datta Jayanti Mahaprasad.
Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

गुरुवारी दिनांक 4 दत्त जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहाने पार पडली. सर्वत्र जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात या दत्त जयंतीमध्ये विरजण पडले. प्रसाद असल्याने सर्व भक्तगणानी आनंदाने त्याचा आस्वाद घेतला. मात्र आज अचानक सर्वांनाच त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.या घटनेचा आरोग्यविभाग आणि प्रशासन तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com