नगरसेवकांचा सभागृहात आनंदोत्सव सुरू असताना विपरीत घडलं; निष्ठावंत कार्यकर्त्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Congress Supporter Died During Felicitation Meeting In Kolhapur: कोल्हापूरमध्ये महापौर निवडीच्या आनंदोत्सवात दुर्दैवी घटना घडली. काँग्रेसच्या अभिनंदन बैठकीदरम्यान समर्थकाची प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याने सभागृहात शोककळा पसरली.
Congress leaders rush outside Tararani Hall after a supporter collapses during the felicitation event in Kolhapur.
Congress leaders rush outside Tararani Hall after a supporter collapses during the felicitation event in Kolhapur.Saam Tv
Published On

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

कोल्हापूरच्या महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड झाल्यानंतर काल सायंकाळी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक राजेश लाटकर यांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र देण्याचा कार्यक्रम छत्रपती ताराराणी सभागृहात सुरू होता. मात्र कार्यक्रमादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आणि आनंदाच्या वातावरणावर शोककळा पसरली.

Congress leaders rush outside Tararani Hall after a supporter collapses during the felicitation event in Kolhapur.
मुख्याध्यापकांचं ऑफिस सील, KDMC ची बेधडक कारवाई, १ कोटी २८ लाखांचं कनेक्शन काय?

महापलिकेमध्ये चार ते पाच वर्षांनी प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आणि प्रत्यक्ष राजकीय कारभार सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरू असतानाच सभागृहाच्या बाहेर काँग्रेसचे नगरसेवक राजू लाटकर यांचे समर्थक अनिल रावळ हे उपस्थित होते. दरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच सभागृहात एकच धावपळ उडाली. ही बातमी समजताच महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर आणि काँग्रेसचे सर्व नगरसेवक तात्काळ सभागृहा बाहेर धावले.

Congress leaders rush outside Tararani Hall after a supporter collapses during the felicitation event in Kolhapur.
मुंबई, ठाण्याहून कल्याणला काही मिनिटांत पोहोचणार; मेट्रो-५ मार्गिकेतील मोठा अडथळा दूर, महत्वाची अपडेट समोर

घटनास्थळी उपस्थित नगरसेवकांनी रावळ यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक राजू लाटकर, विजय हेगडे, रोहित कवाळे आणि विनायक फाळके यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता स्वतःची गाडी बोलावून अनिल रावळ यांना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत अनिल रावळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com