काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! भरधाव कारनं दुचाकीला उडवलं; नवरा-बायको फुटबॉलसारखे उडाले, थरारक घटना CCTV मध्ये कैद

Kolhapur Road Accident CCTV Video : कोल्हापूरमधील वडगाव-हातकणंगले रस्त्यावर भरधाव एर्टिगा कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पती दीपक शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आशादेवी गंभीर जखमी झाल्या.
Kolhapur Vadgaon Hatkanangale road accident CCTV video
Kolhapur Vadgaon Hatkanangale road accident CCTV videoसाम टीव्ही (AI)
Published On: 

रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Kolhapur Vadgaon Hatkanangale road accident CCTV video : कोल्हापूरमधील वडगाव-हातकणंगले रस्त्यावरील काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या एका कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील पती-पत्नी हवेत फुटबॉलसारखे उडून रस्त्यावर लांब जाऊन फेकले गेले. या भीषण अपघातात पतीचा जागीच दुर्दैवी अंत झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सकाळी आठच्या सुमारास घडलेला हा अंगावर काटा आणणारा प्रसंग सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल असा आहे.

नेमकं काय घडलं?

मिरज येथील रहिवासी दीपक रावसाहेब शिंदे आणि त्यांच्या पत्नी आशादेवी शिंदे हे रविवारी वडगाव येथील हनुमान रोड परिसरातील आपल्या आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते. रात्री नातेवाईकांकडे मुक्काम केल्यानंतर, सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास दोघेही पती-पत्नी मोटारसायकलवरून पुन्हा मिरजच्या दिशेने निघाले होते.

Kolhapur Vadgaon Hatkanangale road accident CCTV video
Ramesh Mhatre Case : शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार धक्का, डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक होणार?

ते मिनचे गावाजवळ आले असता, समोरून आलेल्या भरधाव एर्टिगा कारने त्यांच्या दुचाकीला थेट धडक दिली. या भीषण अपघातात दीपक शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी आशादेवी या गंभीर जखमी झाल्या.

Kolhapur Vadgaon Hatkanangale road accident CCTV video
Maharashtra Weather : ऑक्टोबर हिट आधीच सुरू! 'या' भागांत पुढील ४ दिवस परतीचा पाऊस, तर काही जिल्ह्यांत उन्हाचे चटके वाढणार

स्थानिकांची मदतीसाठी धाव, CCTV व्हिडिओ समोर

अपघात घडताच परिसरातील स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या आशादेवी शिंदे यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई व तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com