Kishori Pednekar: SRA घोटाळ्यावरून किशोरी पेडणेकरांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या...

मी तुमच्या दबावाला बळी पडणार नाही, मी बोलणारच; किशोरी पेडणेकर यांचा इशारा
kishori pednekar
kishori pednekar saam tv
Published On

मुंबई - माजी महापौर आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व'आरोप फेटाळून लावले आहे. SRA घोटाळा प्रकरणामध्ये कोर्टाने स्पष्टपणे लिहून दिलं आहे की माझा त्यात समावेश नाही. यामध्ये ते स्वत: किशोरी पेडणेकर यांचा एसआरएने स्पष्ट केलं आहे. दरवेळी किरीट सोमय्या प्रत्येकाला पिंजऱ्यात उभे करतात. एसआरएने कळवलं आहे की किशोरी पेडणेकर यांचा संबंध नाही. त्यामुळे मी तुमच्या दबावाला बळी पडणार नाही, मी बोलणारच, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपला इशारा दिला.

kishori pednekar
घरकाम सांगणं म्हणजे क्राेर्य नाही; उच्च न्यायालयाने विवाहितेला फटकारलं, सासरच्या मंडळींना दिलासा

मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते वारंवार दबाव तत्रांचा वापर सुरू आहे. वार करून विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यांना जेरीस आणले ते भाजपच्या वाॅशिंग मशिन मध्ये गेले हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत. 

मी गोमातानगरमध्ये २०१७ साली अर्ज भरला होता. तेव्हा मी केअर ऑफ म्हणून हा फॉर्म भरलेला होता. पण कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही. गोमात मध्ये काही दुकाणे आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत.

एक जरी गाळेधारक बोलला की गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे असं बोलले तर कुलुप लावा, एका सामान्य महीलेला तुमचा एक माणूस त्रास देतोय, येथे भाड्याने राहणे गुन्हा होता का? मी दुकानदाराणा बोलले माझा गाळा असेल तर ७ दिवसात टाळे लावा, असंही पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

दादरच्या पोलिस स्टेशनला बोलवलं जातय यामुळे विचार करा किती दबाव आहे. मला पोलिसांनी बोलवलं नाही जर बोलवलं तर जाईल हिशोब तर द्यावच लागेल. आज टार्गेट केलं जातंय. तथ्य नसताना तथ्यहीन बोललं जात आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com