Akola : कूलरचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यु; अकोला शहरातील शिवसेना वसाहत परिसरातील घटना

कुलरमध्ये पाणी भरताना अथवा कूलर सुरू असताना त्याला हात लावताना नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे बनले आहे. कूलरचा शॉक लागून मृत्यु झाल्याची अकोल्यात दूसरी घटना घडली आहे.
kid passed away due to electric shock in akola
kid passed away due to electric shock in akolaSaam Digital

- अक्षय गवळी

अकोल्यात कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून एका 7 वर्षीय चिमुकलीला जिव गमवावा लागला आहे. घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना, या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला. युक्ती अमोल गोगे (yukti amol goge) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केल्याची माहिती साम टीव्हीला दिली. दरम्यान कूलरचा शॉक लागून मृत्यु झाल्याची अकोल्यातील ही दूसरी घटना आहे. (Maharashtra News)

अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली. कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला.

kid passed away due to electric shock in akola
महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

युक्तीचे आईवडील व कुटुंबीय घरातच होते. मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली हाेती. युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगताच, गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

kid passed away due to electric shock in akola
Uday Samant : छत्रपतींच्या गादीचा अपमान कोणी केला? बुधवारी कोल्हापुरात सगळं उघडं करणार : उदय सामंत

दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता त्यातून ही दुर्घटना घडली. काही दिवसांपूर्वीचं पाणी भरतांना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा धक्का लागून पोलिस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने (५७, रा. अंबिका नगर, मलकापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

kid passed away due to electric shock in akola
Sveep Awareness Program In Kolhapur : काेल्हापुरात 10 हजार 495 विद्यार्थ्यांंकडून मतदार जागृती, नॅशनल रेकॉर्डसह एशिया पॅसिफीक रेकॉर्डची नोंद (video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com