Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Vote Chori : व्होट चोरीवरून विरोधकांनी रान उठवलेलं असताना आता रायगड जिल्ह्यातील खोपोलीतही मतदार याद्यांमधील घोळ समोर आलयं. मतदार याद्यांमध्ये घोळ कसा झाला? प्रशासनावर काय आरोप करण्यात आलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Vote Fraud Controversy
Vote Fraud Controversyx
Published On

Vote Fraud Controversy : व्होटचोरीचा मुद्दा देशात आणि राज्यात चर्चेत आहे. राहुल गांधींनी केलेल्या व्होट चोरीच्या आरोपानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार याद्यांमधील घोळ समोर येऊ लागलाय. राज्यात छत्रपती संभाजीनगर, पालघर, चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये व्होट चोरीचा आरोप करण्यात आलाय. अशातच रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील मतदार याद्यांमध्येही घोळ झाल्याचं साम टिव्हीच्या निदर्शनास आलंयं..

साम टिव्हीच्या प्रतिनिधीनं खोपोलीतील आम आदमी पार्टीच्या रियाज पठाण यांची भेट घेऊन मतदान याद्यांमध्ये घोळ नेमका कसा झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय... यावेळी पठाण यांनी खोपोलीतील प्रभाग क्रमांक 10 मधील 5 याद्यांचा म्हणजेच 4 ते 5 हजार मतदारांच्या नावांचा अभ्यास केल्याचं सांगितलं.. त्यात 140 मतदारांची नावं दोनदा आल्याचा आरोपही त्यांनी केलाय..

Vote Fraud Controversy
Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

मतदार यांद्यामधील घोळाची व्याप्ती मोठी आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मतदार याद्याच्या तपासणीसाठी विरोधकांनी कंबर कसलीय. त्यात निवडणुक आयोगानं व्होट चोरीच्या मुद्द्याचं खडंन करत सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करणार नसल्याचं आश्वासनं दिलंय. त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांची किती गंभीर दखल घेतली जातेय आणि आगामी पालिका निवडणुका पारदर्शकपणे होणार का? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

Vote Fraud Controversy
Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com