विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर बोगस मतदार याद्यांद्वारे मतदार वाढवल्याचा आरोप केला होता..मात्र निवडणुकीनंतर सुरु झालेल्या SIR प्रक्रियेमुळे बोगस मतदार कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्ह आहेत...आणि त्याला कारण ठरलयं...बोगस SIR प्रक्रिया... नवी मुंबईतील खारघरमधील हा राडा पाहा....
झेरॉक्स सेंटरवर झालेला हा राडा खारघर सेक्टर 19 मधला आहे...SIR अंतर्गत भरलेल्या हजारो फॉर्मच्या झेरॉक्स काढल्या जात असल्याचा आरोप ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला...त्यात महसूल विभागाकडून या फॉर्मची तपासणी झाल्यावर BLOच्या स्वाक्षऱ्या आणि आवश्यक रकाने भरलेले असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आलाय...
दरम्यान भाजपच्या कार्यालयातूनच SIRचे फॉर्म भरले जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेनं केलाय...दुसरीकडे SIR प्रक्रियेतील हा सावळा गोंधळ ठाकरेसेनेनं उघड केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल केलाय...
आता शासकीय प्रक्रियेतील अत्यंत संवेदनशील मानले जाणारे SIRचे फॉर्म एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे कसे पोहोचले आणि त्यांची अनधिकृतपणे झेरॉक्स का काढली जात होती? असे अनेक सवाल उपस्थित होतायत... संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असला तरी हे फॉर्म कुणाच्या आदेशावरून खासगी झेरॉक्स चालकांकडे देण्यात आले होते? यात आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास होणं गरेजचं आहे... अन्यथा बोगस मतदार रोखण्यासाठी सुरु केलेल्या SIR प्रक्रियेमुळेच बोगस मतदाराची वाढ होईल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.