पुण्यात पर्वतीवर कार्तिक स्वामी उत्सवास प्रारंभ; दर्शनाची नेमकी वेळ कोणती? मोरपिसे वाहण्यास बंदी का? जाणून घ्या सर्व माहिती

कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्रानिमित्त पुण्यातील पर्वती मंदिरात कार्तिक स्वामी दर्शनाची पर्वणी आहे. दर्शनाच्या वेळा, मोरपिसे अर्पण करण्यास बंदी आणि मंदिराची वैशिष्ट्ये जाणून घ्या.
Kartik Swami Darshan Pune
Kartik Swami Darshan Pune
Published On: 

पुण्यातील प्रसिद्ध श्रीदेव देवेश्वर संस्थान, पर्वती येथे कार्तिक स्वामी उत्सवास प्रारंभ झाला आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्राची पर्वणी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. मात्र, यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कार्तिक स्वामींना मोराची पिसे वाहू नयेत, असा महत्त्वाचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

मोरपिसे वाहण्यावर बंदी का?

अनेक भाविक अट्टहासाने कार्तिक स्वामींना मोराची पिसे अर्पण करतात. मात्र, या प्रथेला कोणताही शास्त्रीय किंवा धार्मिक आधार नसल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून, त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. याच भूमिकेतून श्रीदेव देवेश्वर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने कार्तिक स्वामींना मोरपिसे वाहण्यास प्रतिबंध केला असून, भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी केले आहे.

कार्तिक स्वामी दर्शनाची नेमकी वेळ काय?

संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, यंदा दर्शनाचा शुभ योग पुढीलप्रमाणे असेल:

पौर्णिमा प्रारंभ: सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी.

पौर्णिमा समाप्ती: मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत.

कृतिका नक्षत्र: मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजून २ मिनिटांपासून ते मंगळवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांपर्यंत.

या संपूर्ण कालावधीत भाविकांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येणार आहे. तसेच, हा दर्शन योग संपन्न झाल्यानंतर बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता संस्थानतर्फे विशेष यागाचे आयोजनही करण्यात आले आहे.

Kartik Swami Darshan Pune
Bisleri Water Quality : बिसलेरीच्या पाण्यामुळे कॅन्सरचा धोका? चाचणीत नमुने फेल; FSSAI आता थेट खटला चालवणार

महिलांना वर्षभर दर्शनाची मुभा व मंदिराचे वैशिष्ट्य

महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणांप्रमाणे पर्वतीवरील कार्तिक स्वामींच्या मंदिरात महिलांना दर्शनास कोणताही प्रतिबंध नाही; येथे महिलांना वर्षभर दर्शनासाठी मंदिर खुले असते. पेशवेकालीन सेनापती रघुनाथराव पेशवे यांनी १७६६ ते १७९१ या काळात हे मंदिर बांधले आहे. कार्तिक स्वामींना देशी गुलाबाची फुले, पिवळा व हिरवा रंग, तसेच दही, दूध आणि गूळ विशेष प्रिय असल्याचे मानले जाते.

Kartik Swami Darshan Pune
महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं सावट? चक्राकार वाऱ्यांमुळे राज्याचं तापमान अचानक बदललं; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.