Bisleri Water Quality : बिसलेरीच्या पाण्यामुळे कॅन्सरचा धोका? चाचणीत नमुने फेल; FSSAI आता थेट खटला चालवणार

Bisleri Water Samples Fail : बिसलेरी इंटरनॅशनलच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा नमुना दोन प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये असुरक्षित ठरल्याची माहिती FSSAI ने दिली आहे. पहिल्या तपासणीत निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त ब्रोमेट, तर दुसऱ्या तपासणीत PAHs आढळले.

तुम्ही कुठेही बाहेर गेलात किंवा घरात पाणी नसेल तर बिसलेरी मागवता का? डोळे झाकून विश्वास ठेऊन बिसलेरीचं पाणी विकत घेताय का मग थांबा कारण बिसलेरीच्या पाण्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. पाण्याच्या टेस्टिंगमध्ये बिसलेरीचं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं समोर आल्यानं FSSAI आता बिस्लेरीवर खटला चालवणार आहे.

चाचणीत काय आढळले?

पाण्याचे नमुने दोनदा चाचणीमध्ये फेल ठरले असून, हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. पहिल्या तपासणीत पाण्यामध्ये ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले होते. तर दुसऱ्या चाचणीत पाण्यामध्ये पीएचएस (PHS) हा कॅन्सरकारक घटक आढळून आल्याचे सांगितले जात आहे.

नमुने थेट कंपनीतून घेतले

महत्त्वाचे म्हणजे, हे नमुने बाजारातून विकत न घेता थेट बिसलेरी कंपनीतून तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यानंतर बिसलेरीवर कोर्टात खटला चालवण्यास एफएसएसएआयकडून मंजुरी मिळाल्याची माहिती या बातमीत देण्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.