Kalyan: पॅथॉलोजी लॅबचा कामगार बनला डाॅक्टर; रेल्वे पोलिसांनी ठाेकल्या बेड्या

संशयित आराेपी एका पॅथॉलोजी लॅबमध्ये कामाला आहे.
Arrest
ArrestSaam Tv

कल्याण : अंबरनाथ रेल्वे स्थानकातील टीसी कार्यलयात रविवारी विकी इंगळे या बाेगस डाॅक्टरला (bogus doctor) रेल्वे पोलिसांनी (railway police) अटक (arrest) केली आहे. रेल्वे हॉस्पिटलचा डिव्हिजनल डाॅक्टर असल्याची बतावणी करणा-या इंगळे चाैघांची फसवणुक करण्याचा प्रयत्नात हाेता. त्याचा डाव रेल्वे पाेलिसांनी हाणून पाडला. (kalyan railway police latest marathi news)

याबाबतची अधिक माहिती अशी : अंबरनाथ रेल्वे स्थानकात चार ते पाच अल्पवयीन मुलांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करत इंगळे टीसीकडे गेला. त्याने मी रेल्वे हॉस्पिटलमध्ये डिव्हिजनल डाॅक्टर असल्याचे सांगितले. टीसीला त्याच्याबाबत संशय आला. टीसीने ही बाब कल्याण (kalyan) येथील प्रशासकीय विभागास कळवली.

Arrest
सोमेश्वर कारखान्यावर शेतकऱ्यांपुढं हात जोडत अजित पवारांनी दिला 'हा' सल्ला

त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इंगळेची चाैकशी केली. त्याचे ओळखपत्र बनावट असल्याचे लक्षात येताच पाेलिसी (police) खाक्या दाखविल्यानंतर ताे घाबरला. दरम्यान पाेलिसांना ताे बोगस डॉक्टर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विकी इंगळेला ताब्यात घेत त्याच्याकडून स्टेटस्कोप, रेल्वे व शासनाचे पाच ओळखपत्र जप्त केले.

विकी हा एका पॅथॉलोजी लॅबमध्ये कामाला आहे. विकीने हे ओळखपत्र का व कोठून बनवले ,या ओळखपत्राचा गैरवापर केला आहे का? याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे अशी माहिती अर्चना दुसाने (पोलीस निरीक्षक, कल्याण जीआरपी) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Arrest
Helmet: महाराष्ट्रात हेल्मेट वापराबाबतचा 'ताे' निर्णय व्हावा : उदय सामंत
Arrest
Rain: साेलापूर, पंढरपुरात पाऊस; द्राक्ष बागांवर संकट
Arrest
Salute: गावातील पहिल्या महिला फौजीची कापूसखेडकरांनी केले जंगी स्वागत
Arrest
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com