सोमेश्वर कारखान्यावर शेतकऱ्यांपुढं हात जोडत अजित पवारांनी दिला 'हा' सल्ला

आज उपमुख्यमंत्री अजित पवार सोमेश्वर कारखाना स्थळावर आले हाेते.
ajit pawar
ajit pawarsaam tv
Published On

बारामती : आमचा ऊस घेऊन जावा. आमचा ऊस (sugarcane) जळत आहे. ताे लवकर घेऊन जा अशी विनंती आणि तक्रारी सध्या सुरु आहेत. या तक्रारी करण्यापेक्षा पाण्याची (water) उपलब्धता पाहून ऊस लागवडीचे नियाेजन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी शेतकऱ्यांना (farmer) केले आहे. (ajit pawar latest marathi news)

बारामती (baramati) तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (someshwar sugar factory) विस्तार वाढ उदघाटन मंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जाहीर सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले उन्हाळा सुरू झाल्याने ऊस पाण्याअभावी जळू लागला आहे. त्यामुळे तोड लवकर द्यावी अशी अनेक निवेदन आली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणे, कॅनाॅल भरली. दुष्काळ असता तर मी समजू शकताे. परंतु यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे तक्रारी याेग्य नाहीत.

ajit pawar
World Cup: अलायसा हिलीनं केल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा

ऊस लागवडीचे नियोजन योग्यरित्या करून ताे लावला पाहिजे. विनाकारण वाढीव काम वाढवून ठेवायचे आणि नंतर ऊस जळत असल्याची तक्रार करायची हे याेग्य नाही. तुमच्याकडील विहिरीचे पाणी, ज्या पाण्यावर ऊस लावू शकता ते तपासा. माझी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की पाण्याची उपलब्धता पाहून ऊस लागवड करा असे आवाहन पवार यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

ajit pawar
Junnar: गृहमंत्र्यांकडे तक्रार हाेताच पुणे ग्रामीण पोलीसांनी चार जणांना पकडले
ajit pawar
Crime News: पंढरपूरात पत्नीचा ब्लेडने गळा कापण्याचा प्रयत्न; पतीस अटक
ajit pawar
Nanded: राज ठाकरे जे बाेलले ते सत्यच : देवेंद्र फडणवीस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com