Dombivali News: डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; महापालिकेकडून डी-कंजेक्शनचा प्लान तयार

Kalyan-Dombivli News Today: डोंबिवलीकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण, ठाणे-डोंबिवलीला जोडणारा डोंबिवली खाडीवरील मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
Kalyan News Today mankoli mothagaon bridge will be opened for traffic soon
Kalyan News Today mankoli mothagaon bridge will be opened for traffic soonSaam TV
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Kalyan-Dombivli News Today: डोंबिवलीकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण, ठाणे-डोंबिवलीला जोडणारा डोंबिवली खाडीवरील मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या दोन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होणार असून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. (Latest Marathi News)

पुलाचे काम पूर्ण होण्याआधीच पुलामुळे डोंबिवली पश्चिमेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. मात्र, त्यावर तोडगा काढण्यासाठी डी कंजेक्शनचा प्लान तयार करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

Kalyan News Today mankoli mothagaon bridge will be opened for traffic soon
Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाने आता कधी, कुठे दिला पावसाचा अलर्ट?

हा प्लान तयार करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित नियोजन केले आहे. दीवा वसई मार्गावरील मोठा गाव ठाकूर्ली येथे रेल्वे फाटक आहे. हे फाटक बंद होणार आहे. त्याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या उड्डाणपूलाचे काम येत्या दिवाळीत सुरु केले जाईल.

या उड्डाणपूलाचे सात आठ महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. त्याच्या भूसंपानाकरीता निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्याने भूसंपादनाची प्रक्रिया लवकर मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर मोठा गाव ठाकूर्ली -माणकोली खाडी पूलाजवळून कल्याण रिंग रोड जात आहे. मोठा गाव ठाकूर्ली ते कल्याण दुर्गाडी हा रिंग रोड प्रकल्पाचा तिसरा टप्पा आहे.

या तिसऱ्या टप्प्याच्या कामाची निविदा एमएमआरडीएने प्रसिद्ध केले आहे. निविदा मंजूर होताच या रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु केले जाणार आहे. याशिवाय मोठा गाव ठाकू्र्ली ते कोपर हा १८ मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता एमएमआरडीएकडून केला जात आहे. त्याला निधी मंजूर आहे.

Kalyan News Today mankoli mothagaon bridge will be opened for traffic soon
Chandrayaan-3 Mission: प्रतीक्षा चंद्रस्पर्शाची! भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस; विक्रम लँडर चंद्रावर उतरणार

रेल्वे उड्डाण पूल झाल्यावर माणकोली खाडी पूलावरुन येणारी वाहने ही जुनी डोंबिवली आणि देवीचा पाडा या दिशेने जाऊ शकतात. या विविध उपाययोजना करण्यात आल्या असून खाडी पूल खुला होण्यापूर्वीच पूलामुळे डोंबिवली पश्चिमेत वाहतूक कोंडीचा सामना कराव लागू शकतो अशी आवई विरोधकांकडून उठविली जात आहे.

दरम्यान, म्हात्रे यांनी या गोष्टीचे खंडन करीत डी कंजेक्शन प्लान हा वाहतूक कोंडीवर तोडगा असल्याचे स्पष्ट केले आहे. खाडी पूल करताना त्याठिकाणी पुलाखालून जलवाहतूक येईल इतके अंतर सोडण्यात आले आहे. भविष्यात कल्याण ते ठाणे हा जलवाहतूकीचा मार्ग सुरु होणार आहे. त्यासाठी ही उपाययोजना आधीच करण्यात आली आहे, याकडेही म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com