Chandrayaan-3 Mission: प्रतीक्षा चंद्रस्पर्शाची! भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस; विक्रम लँडर चंद्रावर उतरणार

Chandrayaan-3 Latest News: भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कारण, भारताची महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान -३’ मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे.
Chandrayaan-3 Mission Latest News
Chandrayaan-3 Mission Latest NewsSaam Tv

Chandrayaan-3 Latest News: भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कारण, भारताची महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान -३’ मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. चांद्रयान चंद्रावर लँड करण्यासाठी आता फक्त काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. या ऐतिहासिक घटनेकडे भारतीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करावं, यासाठी ठिकठिकाणी पूजा अर्चना तसेच प्रार्थना करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Chandrayaan-3 Mission Latest News
Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाने आता कधी, कुठे दिला पावसाचा अलर्ट?

‘चांद्रयान -३’ मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागावर यान अलगद व सुरक्षितपणे उतरविण्याच्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणारा भारत हा अमेरिका, रशिया (तत्कालीन सोव्हिएत रशिया), चीननंतर चौथा देश ठरणार आहे.

चांद्रयान -३चे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्यास भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो सज्ज असून आज सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी यानाचे पाय चांद्रभूमीला लागतील. भारताच्या चांद्रयान मोहिमेला २००८ मध्ये सुरुवात झाली होती.

पहिल्या मोहिमेत यान चंद्राभोवती फिरले. ‘इस्रो’ने ४ वर्षांपूर्वी ‘चांद्रयान -२’ यान पाठविले होते. पण ७ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधीच लँडरचा संपर्क तुटला आणि ही मोहिम अयशस्वी झाली. या अपयशानंतर इस्त्रोचे वैज्ञानिक खचले नाही. त्यांनी पुन्हा ४ वर्षातच चंद्रावर जाण्याची मोहिम आखली.

Chandrayaan-3 Mission Latest News
Chandrayaan 3 Updates: चांद्रयान ३ दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर सर्वप्रथम काय करणार? इस्रोचा प्लान काय?

चंद्रावर उतरण्याची १७ मिनिटं गुंतागुंतीची

‘चांद्रयान- ३’ चंद्रावर उतरविण्याच्या प्रक्रियेत १७ मिनिटे गुंतागुंतीची असतील, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांसह अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित आहे. जेव्हा लँडर त्याचे इंजिन योग्य वेळी आणि योग्य उंचीवर सुरू करते तेव्हा योग्य प्रमाणात इंधन वापर केला जातो.

चंद्राला स्पर्श करण्यापूर्वी कोणते अडथळे किंवा उंचसखल भाग अथवा खड्डे आहेत, याची पाहणी करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण केले जाते. सर्व घटकांची तपासणी केल्यानंतर आणि यान उतरविण्याचा निर्णय झाल्यानंतर बंगळूरजवळील ब्यालालू येथील ‘इंडियन डीप स्पेस नेटवर्क’मधून (आयडीएसएन) आवश्‍यक सर्व आज्ञा ‘इस्रो’कडून ‘एलएम’ला दिल्या जातील.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com