अभिजीत देशमुख
कल्याण : सरकारमान्य नर्सिंग कोर्सच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांत फसवणूक (Fraud) केल्याचे तसेच त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घातल्याची घटना कल्याणमध्ये (Kalyan) समोर आली आहे. या प्रकरणी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. (Maharashtra News)
उडान इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे विश्वकर्मा सिटी ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट सेंटरमध्ये हा प्रकार घडला असून कल्याण पश्चिमेकडील झुंजारराव संकुलात इन्स्टिट्यूट होते. इन्स्टिट्यूटमध्ये सरकार मान्य असलेल्या नर्सिंग कोर्स करून देतो. या नावाखाली (Student) विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. तसेच कोर्स पूर्ण झाल्याबाबतचे देण्यात आलेले सर्टिफिकेट बनावट असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी शिवसेना शाखेशी संपर्क साधला. शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह विद्यार्थ्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली.
विद्यार्थ्यांचे वर्ष गेले वाया
या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान सरकारमान्य कोर्स नावाने बनावट सर्टिफिकेट देत लाखो रुपये उकळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालवणाऱ्या या इन्स्टिट्यूट विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.