अभिजित देशमुख
कल्याण : कोकणासह कल्याण- डोंबिवलीत काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा जागा मिळालेली नाही. यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने जागा वाटपात कोकणासह कल्याण डोंबिवलीत काँग्रेसला बाजूला ठेवल्याचा आरोप करत कल्याण डोंबिवलीतील कोंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत कोंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली.
कल्याण- डोंबिवलीमधील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघावर काँग्रेसने दावा केला होता. मात्र या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडत महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) काँग्रेसची स्थिती दुय्यम का? असा सवाल केला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही लोकसभेत तुतारीचे काम करायचे आणि विधानसभेत मशालचे काम करायचे का? कोकणासह कल्याण- डोंबिवलीत (Congress) काँग्रेसला बाजूला ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संधी दिली गेल्याचा आरोप त्यांनी केला.
तर पाठींबा देणार नाही
दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जिवंत ठेवायचे असेल, तर कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या विधानसभा जागांबाबत दोन दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा, काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत निर्णत घेतील; असे आवाहन केले आहे. दरम्यान कोंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत त्यांनी सांगितले की कोंग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, अद्याप मला एबी फॉर्म मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.