
Kalyan Dispute case : कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. मराठी कुटुंबाला मराहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाच्या मुसक्या आवळल्या आहेत. कल्याण मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अखिलेश शुक्लाला अटक केली आहे. शुक्लासोबत आणखी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या अजमेरा हाईट्स इमारतीत राहणारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अखिलेश शुक्ला याने शेजारी राहणाऱ्या देशमुख कुटुंबावर हल्ला केला होता. या प्रकारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणा शुक्लाने देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. हीच मारहाण करणाऱ्या शुक्लाला अटक करण्यात आली आहे.
कल्याणमधील देशमुख कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अखिलेशला नेमकं खडकपाडा पोलिसांनी कुठून ताब्यात घेतलं, याची माहिती समोर आलेली नाही. अखिलेश शुक्लाच्या मारहाणीचा मुद्दा सभागृहातही गाजला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्लाला निलंबित केल्याची माहिती दिली. तसेच त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
अखिलेश शुक्लाने मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारानंतर महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कठोर कारवाईची मागणी केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा निषेध केला होता. तसेच हा महाराष्ट्र हा मराठी माणसांचा अपमान आहे, असं सांगून शुक्लावर कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी अखिलेश शुक्ला याला खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.