Buldhana Crime : बसमध्ये चढतांना महिलेचे दागिने लंपास; अडीच लाख रुपयाच्या दोन चैन चोरीला

Buldhana News : महिलांना अर्धे तिकीट असल्याने बसमध्ये प्रवास करण्याची महिलांची प्रचंड गर्दी दिसून येते. या गर्दीचा फायदा चोरटे घेत असून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चैन तोडून नेत असल्याचे घटना समोर आल्या
Buldhana Crime
Buldhana CrimeSaam tv
Published On

बुलढाणा : गर्दीचे ठिकाण पाहून चोरटे संधी साधत हात साफ करत असतात. तर बसस्थानकात देखील चोरट्यांचा सुळसुळाट पाहण्यास मिळत असतो. याच दरम्यान बुलढाणा बस्स्थानकावर मोताळा जाण्यासाठी एक महिला कुटुंबासह बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील दोन सोन्याच्या चैन लंपास केल्याची घटना घडली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना अर्धे तिकीट असल्याने बसमध्ये प्रवास करण्याची महिलांची प्रचंड गर्दी दिसून येते. या गर्दीचा फायदा चोरटे घेत असून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चैन तोडून नेत असल्याचे घटना समोर आल्या आहेत. त्यानुसारच बुलढाणा बसस्थानकावर महिलेच्या चैन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 

Buldhana Crime
Cotton Price : कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाची घरात साठवणूक; शेतकरी आर्थिक संकटात

बुरखाधारी महिलेने साधली संधी 

बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत बुरखाधारी महिलेने प्रीती बडगावकर या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले आहे. बस मध्ये गर्दी असल्याने प्रीती बडगावकर बसमध्ये चढल्या नाही. त्यांना आपल्या पर्सची चैन उघडलेली दिसली. त्यांनी आपली पर्स तपासली असता त्यांना पर्समधील अडीच लाख रुपयाच्या सोन्याच्या दोन पोथा गायब झाल्याचे दिसून आले.  

Buldhana Crime
Jalgaon Accident : दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार

पोलिसात तक्रार 

पर्समध्ये ठेवलेल्या दोन सोन्याच्या चैन दिसून न आल्याने प्रीती बडगावकर या हादरल्या. त्यांनी लागलीच बुलढाणा पोलिसात धावं घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी बसस्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता एक बुरखाधारी महिला पर्समधून चोरी करताना दिसून आली. यानंतर चोरी करणाऱ्या बुरखाधारी महिलेचा तपास पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com