Mumbai Crime News : धक्कादायक! घरातील बेडरूममध्ये गांजाची लागवड; मुंबईत १५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Mumbai News : नववर्ष स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत असते. प्रामुख्याने या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर अधिक होत असतो. पोलिसांनी देखील यावर नजर आहे
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही

नवी मुंबई : नवीन वर्ष सेलिब्रेशन करताना अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. दरम्यान नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेल्या अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. साधारण १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. 

गांजा तसेच नशेसाठी वापरण्यात येणारे अमली पदार्थ वापर, विक्रीसाठी बंदी आहे. मात्र यांचा वापर छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहण्यास मिळते. दरम्यान नववर्ष स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत असते. प्रामुख्याने या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर अधिक होत असतो. यामुळे पोलिसांनी देखील यावर नजर आहे. अशातच मुंबईमध्ये मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. 

Mumbai Crime News
Parali News : शिवभोजन केंद्रात जेवण करण्यासाठी आलेल्या दिव्यांगाला बेदम मारहाण; बीडच्या परळीतील घटना

१५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ केले जप्त
मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने सदरची कारवाई केली असून बँकॉक वरून आलेला १३ किलो हायब्रीड ट्रेन गांजा जप्त तसेच ४८९ ग्रॅम हायड्रोफोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. घरातील बेडरूममध्ये हायड्रोफोनिक गांजाची लागवड सुरू होती. याच ठिकाणी हि कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत दोन जणांना एनसीबीने अटक केली आहे. 

Mumbai Crime News
Jalna Police : अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरणी पाचजण ताब्यात; जालना पोलिसांची कारवाई

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडला 

दरम्यान पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा आढळून आला आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली आहे. हा प्रकार १२ डिसेंबरला समोर आला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक पाचमधील एका खोलीत विद्यार्थी गांजा ओढत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाकडे केली. त्यानुसार सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनेची पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. 

दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल 

वस्तीगृहातीलच विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनुसार सुरक्षा विभागाने तक्रारदार विद्यार्थी आणि गांजा ओढत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विद्यापीठ परिसरात असा प्रकार समोर आल्याने विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com