Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv

Kalyan Crime News : कल्याणमध्ये संतापजनक घटना; १० वर्षीय मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan News : कल्याण पूर्व येथील आडवली परिसरात एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी काही मुलांसोबत खेळत असताना एका मुलासोबत घरात गेली
Published on

अभिजित देशमुख 
कल्याण
: बदलापूरमधील मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्व आडीवली भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत धर्मेंद्र यादव या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. 

Kalyan Crime News
Nanded News : सावकाराच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपविले जीवन; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण (Kalyan) पूर्व येथील आडवली परिसरात एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी काही मुलांसोबत खेळत असताना एका मुलासोबत घरात गेली. मुलगी घरात येतात मुलाच्या वडिलांनी या मुलीला आपल्याजवळ बोलून घेतले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तत्काळ याबाबत मानपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत (Manpada Police) मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू केला.

Kalyan Crime News
Dhule Rain : सततच्या पावसामुळे शेतात साचले पाणी; पिके सडण्याची भीती

नराधमास ७ दिवसांची पोलीस कोठडी 

दरम्यान संशयित आरोपी धर्मेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने धर्मेंद्र यादव याला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्मेंद्र याने या मुलीसोबत किंवा आणखी काही मुलीसोबत असा प्रकार केला आहे का? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com