Nanded News : सावकाराच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपविले जीवन; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nanded News : ग्रामसेवक कागदे यांनी बारा वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ साली १३ लाख ६० हजार रुपये शेत जमीन गहाण ठेवून सावकाराकडून व्याज कर्ज घेतले होते
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: ग्रामसेवकाने सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. सदरची रक्कम परत केल्यानंतर देखील सावकाराचा व्याजासाठी तगादा सुरूच होता. सावकारांच्या या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात समोर आला. 

Nanded News
Panjhara River : पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; धुळे शहरातील पुलावरून नागरिकांना प्रवेश बंदी

नांदेडच्या (Nanded News) अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील ग्रामसेवक नारायण कागदे यांनी आत्महत्या केली आहे. ग्रामसेवक कागदे यांनी बारा वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ साली १३ लाख ६० हजार रुपये शेत जमीन गहाण ठेवून सावकाराकडून व्याज कर्ज घेतले होते. दरम्यान कागदे यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड केली. तरी देखील आरोपी सावकारांने शेती स्वतःच्या नावावर करून दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विक्री करून शेतीचा ताबा देण्यास नकार दिला. अशी तक्रार मयत (Gram sevak) ग्रामसेवकाच्या भावाने अर्धापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. 

Nanded News
Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांना ५ लाखाची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

सावकारांचा जाच सहन न झाल्याने ग्रामसेवकाने कागदे यांनी दोन पानाची सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. मी गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचे ग्रामसेवक नारायण कागदे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल आहे. याप्रकरणी सहा आरोपी विरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com