Beed News
Beed NewsSaam Tv

Beed : जयदत्त क्षीरसागरांकडून भाजपचा वापर; संदीप क्षीरसागर यांचा काकांवर गंभीर आरोप...

जयदत्त क्षीरसागरांनी चिन्हांच्या माध्यमातून समोर यावं पुतण्या संदीप क्षीरसागरांचे आव्हान
Published on

Beed Latest News : बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद सर्वश्रुत आहे. आता पुन्हा एकदा काका जयदत्त क्षीरसागर यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याने, पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

Beed News
Shubhangi Patil News: काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी शुभांगी पाटील रवाना

काका जयदत्त क्षीरसागरांकडून (Jaydutta Kshirsagar) भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जातोय. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर यावं असं खुलं आव्हान पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिलंय.

Beed News
Babar Azam: खासगी Video आणि फोटो लीक झाल्यानंतर बाबर आझमचे ट्विट चर्चेत, म्हणतोय; 'आनंदी राहण्यासाठी...'

काकांची भाजपसोबत (BJP) जवळीक वाढत आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर संदीप क्षीरसागर म्हणाले की, माझ्यासहित बीड मतदार संघात इतरांना देखील हा प्रश्न पडला आहे की ते आहेत कुठे आणि त्यांची भूमिका काय, करणं राजकारणामध्ये भूमिका ही स्पष्ट असावी लागते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केला आहे हा त्यांचा इतिहास आहे असे देखील संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com