Shubhangi Patil News: काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी शुभांगी पाटील रवाना

काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी शुभांगी पाटील रवाना
Shubhangi Patil News
Shubhangi Patil NewsSaam tv

धुळे : नाशिक पदवीधर मतदार संघातून उमेदवारी करत असलेल्‍या शुभांगी पाटील या धुळ्यात आल्‍या होत्‍या. यानंतर शुभांगी पाटील या काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्यासाठी धुळ्यातून (Dhule) रवाना झाल्या आहेत. (Breaking Marathi News)

Shubhangi Patil News
Amalner News: अंगावरून गेले ट्रॅक्‍टर, तरूणाचा मृत्‍यू; वाळू वाहतुकदारांशी वादातून घात की अपघात?

उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या पाठिंबा संदर्भात नाशिक पदवीधर मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचे चित्र स्पष्ट होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

दोन्‍ही पक्षांची भुमिका अद्याप स्‍पष्‍ट नाही

अद्याप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या पाठिंबाबद्दल अद्यापही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आली नसून, शुभांगी पाटील या उमेदवार आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com