जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Jayant Patil Meets CM Fadnavis: जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट, पी. चिदंबरम यांच्या दाव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांना उधाण.
जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट
Published On

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डीलिमिटेशन विधेयकामुळे महाराष्ट्रातलं राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. यात शरद पवारांची मोठी भूमिका असण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यानंही याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. नेमका काय आहे हा गौप्यस्फोट? राज्यात काय राजकारण शिजतंय? जयंत पाटलांनी फडणवीसांची भेट का घेतलीय? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट...

शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपप्रणीत एनडीएमध्ये जाणार असल्याचा चर्चा गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात सातत्यानं सुरु होत्या... अशातच खासदार पी. चिदंबरम यांनी डिलिमिटेशनसाठी पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केलाय...चिदंबरम यांनी काय पोस्ट केलीय पाहूयात...

टीएमसीमध्ये फूट पाडल्यानंतर, आता डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी आवश्यक मते मिळवण्याच्या उद्देशाने भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि डीएमकेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे... मात्र जर या पक्षांनी या विधेयकाच्या नवीन मसुद्याला पाठिंबा दिला, तर ती त्यांच्या स्वतःच्या विवेकबुद्धीशी केलेली प्रतारणा ठरेल.

चिदंबरम यांनी ही पोस्ट केल्याच्या अवघ्या काही मिनिटात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील मुख्यमंत्र्य़ांच्या 'वर्षा' बंगल्यावर बैठकीसाठी पोहचले...या गुप्त भेटीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा आणखी जोर धरू लागली...मात्र जयंत पाटलांनी

आणि सुप्रिया सुळेंनी यावर काय स्पष्टीकरण दिलं ते पाहूयात...

जयंत पाटलांनी जरी भेटीमागचं कारण स्पष्टपणे सांगितलं असलं तरी पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी डिलिमिटेशनचं विधेयकाबाबत काही अटी शर्तींवर पाठिंबा देण्याचे संकेत दिले. मात्र सुळेंच्या या विधानानं मविआत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे...

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट
शरद पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळे-तावडेंच्या 21 भेटी

वरकरणी डिलिमिटेशनचं कारण दिसत असलं तरी पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार आणि खासदार सत्तेत जाण्याचा आग्रह धरत असल्याची चर्चा आहे. विकासनिधी आणि रखडलेली काम मार्गी लावण्यासाठी पंक्षार्तगत दबाव वाढत चालल्याचं बोललं जातंय.

हे सर्व पाहता पडद्यामागे काहीतरी मोठ्या घडामोडी सुरु असल्याचं दिसतंय. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपला प्रादेशिक पक्षांची गरज आहे, आणि त्यासाठीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साद घातली जात असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळतायत...आता शरद पवार एनडीला साथ देणार की महाविकास आघाडीतच राहणार? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

गणेश कवडे, वैदही काणेकरसह सूरज मसूरकर, मुंबई

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट
Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com