Mokhada Rural Hospital : मातेचा मृत्यूनंतर आता बाळाचा मृत्यू; मोखाडा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्याने घडल्या घटना

Jawhar Mokhada News : गरोदर मातेच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच मोखाडा तालुक्यातील कुर्लोद गावातील बाळ मृत्यू झाल्याची घटना घडली प्रशासन आणखीन किती बळी घेणार प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे
Mokhada Rural Hospital
Mokhada Rural HospitalSaam tv
Published On

फैय्याज शेख 

मोखाडा (जव्हार) : मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालय ऐका पाठोपाठ दोन घटनांनी चर्चेत आले आहे. मातेचा मृत्यु झाल्यानंतर आता दुसऱ्या घटनेत बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केवळ रूग्णालयात डॉक्टर वेळवर हजर राहत नाही. यामुळेच या मृत्यूच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बालके कुपोषित आहेत. कुपोषण मुक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले. मात्र रूग्णालयात उपचारासाठी तंत्र डॉक्टरच उपलब्ध नसल्याने कधी गरोदर मातेचा मृत्यु तर कधी बाळाचा मृत्यू होतांनाच्या घटना घडतात. प्रशासन आणखीन किती बाळांचा बळी घेणार अशी तीव्र संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Mokhada Rural Hospital
Ujani Dam : उजनी धरणावर कृषी पर्यटनासाठी १९ कोटींचा निधी; पर्यटकांसाठी बांधण्यात येणार रिसॉर्ट

आशा भुसारे या गरोदर मातेच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मोखाडा तालुक्यातील कुर्लोद गावातील बाळ मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गरोदर महिला संगीता दोंदे हिच्या पोटात दुखू लागल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे घेऊन गेले. येथे गेल्यानंतर शिकाऊ डॉक्टर व नर्स होती. त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. त्यानंतर येथे पण तंत्र डॉक्टर हजर नव्हते. या रूग्णालयात एक दिवस ठेवून पहाटे तीन वाजता नाशिक येथे घेऊन जाण्यास सांगण्यात आले. 

Mokhada Rural Hospital
Grapes : नवीन बेदाणा बाजारात येणार उशिराने; बेदाणा निर्मिती महिनाभर लांबणीवर

रस्त्यातच झाली प्रसूती 

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पहाटे मोखाडाहून नाशिकच्या दिशेने जात असताना आंबोली घाटात संगीताची प्रस्तुती झाली. सकाळी आठ वाजता आंबोली येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र दुपारनंतर बाळाची तब्येत बिघडली असता त्र्यंबकेश्वर येथील रूग्णालयात पाठवले. मात्र तेथून सुद्धा त्यांनी रात्री ९ वाजता नाशिक सिव्हील रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. तेव्हा नाशिक येथील रूग्णालयात घेऊन गेले असता दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी बाळ दगावले असल्याचे सांगितले. 

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 

या सर्व घटनेला दोन दिवसांचा कालावधी गेला असून वेळेवर उपचार व प्रस्तुती झाली असती तर आज बाळ देखील सुखरूप असते. दरम्यान जव्हार तालुक्यातील मोखाडा येथील ग्रामीण रूग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून अशा घटना सातत्याने घडत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन या घटनाक्रमकडे दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न जव्हार मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना पडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com