Jalna News: धक्कादायक! शेतात काम करताना रान डुकरांचा हल्ला; ३ जण गंभीर जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
Jalna News
Jalna NewsSaamtv
Published On

Jalna News: रानडुकराच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना जालना तालुक्यात घडली आहे. जालन्याच्या पिंपळगाव गावात घडलेल्या या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jalna News
Amravati Accident: दुर्देवी! दुचाकींची समोरासमोर धडक; भीषण अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, रानडुकराच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगावात घडली आहे. हस्ते पिंपळगाव (Pimpalgaon) शिवारात महादेव किटाळे हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांच्यावर अचानक धावत येऊन रानडुकराने हल्ला चढवला. या हल्यानंतर त्यांनी आपल्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

ओरडण्याचा आवाज येताच शेतात असलेल्या शोभा किटाळे आणि मनोहर किटाळे यांनी त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र पिसाळलेल्या या रानडुकरांनी त्यांच्यावर ही हल्ला चढवत त्यांना ही गंभीर जखमी केले. (Jalna Latest News)

Jalna News
Nagpur News: भाजपचे 2 माजी आमदार BRS च्या गळाला! के चंद्रशेखर राव यांचं नागपूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

रानडुकराच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी ते गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com