K. Chandrasekhar Rao in Nagpur : : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाचा प्रवेश झाला आहे. तेलंगणा राज्यात सत्तेत असलेल्या बीआरएस (BRS) म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात आपलं नशीब आजमणार आहे. मराठवाड्यात मेळावा घेतल्यानंतर आज नागपूमध्ये पक्षाचा मेळावा पार पडला. बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन पक्षाच्या राज्यातील स्वतःच्या कार्यलयाचे उदघाटन केले.
भाजपचे माजी आमदार बीआरएसमध्ये
भाजपचा गड असलेल्या विदर्भात आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नागपुरात शक्तीप्रदर्शन केले. एवढेच नाही तर भाजपचे 2 माजी आमदार BRS च्या गळाला लागले आहेत. माजी आमदार चरण वाघमारे आणि राजू तोडसाम यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय गेतला आहे.
याशिवाय माजी अपक्ष आमदार दिपक आत्राम देखील बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. ”शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही बीआरएसमध्ये जातोय. आगामी विधानसभा निवडणूका लढणार” असा निर्धार या माजी आमदारांनी व्यक्त केला आहे.
नागपुरात शहरभर बीआरएसचे पोस्टर्स
आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर BRS ची विदर्भात जुळवाजुळव सुरु आहे. “अब की बार किसान सरकार” असं म्हणत शहरात सर्वत्र केसीआर राव यांचे होर्डिंग्ज लागले आहेत. नागपूर विमानतळावर के चंद्रशेखर राव यांच्या स्वागतासाठी बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (Maharashtra Politics)
मराठवाड्यानंतर गुलाबी वादळ विदर्भाच्या दिशेने
मराठवाड्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाचं गुलाबी वादळ आता विदर्भात धडकलं आहे. विदर्भातील नागपूरमध्ये पक्षानं राज्यातील पहिलं स्वतःच्या मालकीचं कार्यालय आज सुरू केलं आहे. पक्षानं मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात हा पक्ष कुणाचा गड पाडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Latest Political News)
एन्ट्रीलाच 3 माजी आमदारांचा प्रवेश
यानिमित्ताने बीआरएस पक्षाने मराठवाड्यानंतर आता विदर्भात देखील आपले पाय रोवायला सुरूवात केलीय. महत्वाचे म्हणजे पक्षाच्या एन्ट्रीलाच 3 माजी आमदारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे माजी आमदार चरण ठाकूर, माजी आमदार राजू तोडसाम आणि अपक्ष आमदार दीपक आत्राम यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केलाय. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.