Amravati News
Amravati NewsSaamtv

Amravati Accident: दुर्देवी! दुचाकींची समोरासमोर धडक; भीषण अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू

Accident News: दोन्ही दुचाकी समोरा समोर धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Published on

अमर घटारे, प्रतिनिधी....

Amravati Accident News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्रच सुरू आहे. समृद्धी महामार्गावर दररोज अपघाताच्या बातम्या समोर येत असताना आता अमरावती जिल्ह्यात एक भीषण अपघाताची दुर्घटना समोर आली आहे. दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Amravati News
Nagpur News: भाजपचे 2 माजी आमदार BRS च्या गळाला! के चंद्रशेखर राव यांचं नागपूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावतीत दर्यापूर ते अकोट मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही दुचाकी समोरा समोर धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झालाय

तन्मय वानखडे व विलास चहाकर असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याची माहिती तात्काळ दर्यापूर पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Amravati News
Beed Child Marriage: बालविवाह लावल्याप्रकरणी नवरदेवासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल; बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

दरम्यान, आज सकाळी समृद्धी महामार्गावरही एक अपघाताची घटना समोर आली होती.  नागपूरवरून कोल्हापूरसाठी निघालेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) कार चालकाला डूलकी लागली. यात कारचा अपघात (Accident) झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या १६९ हद्दीत घडला आहे. यात कारमधील तीन जण जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com