OBC Protest Video: लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली, ओबीसी समाज आक्रमक; धुळे- सोलापूर महामार्गावर रास्तारोको

Dhuel-Solapur Highway: ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू आहे. आंदोलनकांनी महामार्गावर टायगर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
OBC Protest Video: लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली, ओबीसी समाज आक्रमक; धुळे- सोलापूरवर रास्तारोको
Jalna ProtestSaam Tv

अक्षय शिंदे, जालना

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जालन्यामधील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खलावली त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्तोरोको आंदोलन केले आहे. ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू आहे. आंदोलनकांनी महामार्गावर टायगर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळावर पोलिस दाखल झाले असून ते वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालवत असताना सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत आज सायंकाळी ओबीसी आंदोलकांनी धुळे- सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रस्तारोको सुरू केला. ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. धुळे -सोलापूर महामार्ग ओबीसी आंदोलनकांनी रोखून धरलाय. लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली तरी देखील सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

OBC Protest Video: लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली, ओबीसी समाज आक्रमक; धुळे- सोलापूरवर रास्तारोको
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; मतदान आणि मतमोजणीची तारीखही ठरली, Video

रस्त्यावर टायर जाळन राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. हे जातीवादी मुख्यमंत्री आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उपोषणकर्ते जीवाचं रान करत आहेत. त्यांचा बीपीसुद्धा वाढलेला आहे. तरीसुद्धा सरकार कुठलीही भूमिका घेत नसल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.

आंदोलकांनी अचानक रस्तारोको सुरू केल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पोलिस आंदोलकांना समजविण्याच्या प्रयत्न करत आहेत. लक्ष्मण हाके यांनी विनंती केल्यानंतर ओबीसी समाज बांधवांनी महामार्ग मोकळा करून दिला. आता सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे. सध्या याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

OBC Protest Video: लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली, ओबीसी समाज आक्रमक; धुळे- सोलापूरवर रास्तारोको
Chhagan Bhujbal on OBC Reservation: लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला छगन भुजबळांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन घेणार भेट

एका आंदोलकाने सांगितले की, आमच्या संघर्षयोद्धा लक्ष्मण हाके यांनी सहा दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केला आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे तहसिलदार, कलेक्टर किंवा सरकार आलेले नाही. आमच्या संघर्षयोद्धांची तब्येत खालावली आहे. आम्हाला ते बघवत नाही. जर त्यांना काही जीवितहानी झाली तर आम्ही महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही.', असा इशारा संतप्त आंदोलनकांनी दिला आहे.

OBC Protest Video: लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली, ओबीसी समाज आक्रमक; धुळे- सोलापूरवर रास्तारोको
Laxman Hake Hunger Strike: अजित पवार पक्षाच्या OBC प्रदेशाध्यक्षाचे थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com