विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, मतदान आणि मतमोजणीची तारीख ठरली
Vidhan Parishad Teacher, Graduate Election DatesSaam tv

Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; मतदान आणि मतमोजणीची तारीखही ठरली, Video

Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आलीये. निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
Published on

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.

विधान परिषदेतील ११ सदस्यांचा पुढील महिन्याच्या २७ तारखेला कार्यकाळत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानपरिषदेची निवडणुकीसाठी मतदान १२ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षाकडून कोणाला संधी मिळते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, मतदान आणि मतमोजणीची तारीख ठरली
Mann Ki Baat: तारीख ठरली! पंतप्रधान मोदींची 'मन की बात' पुन्हा सुरू होणार, जनतेला संबोधित करणार

विधान परिषदेची निवडणूक ही २५ जून ते १६ जुलैपर्यंत पूर्ण होईल. यामुळे उमेदवारांना २५ जून ते २ जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. या निवडणुकीसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. तर त्याच दिवशी सांयकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल.

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, मतदान आणि मतमोजणीची तारीख ठरली
Rahul Gandhi: मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियांका गांधी लढवणार खासदारकीची निवडणूक

निवृत्त होणारे सदस्य कोण?

मनिषा कायंदे, विजय गिरकर, ​​अब्दुल्ला अब्दुल लतीफ खान, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ वजाहत मिर्झा ,डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत प्रभाकर पाटील हे सदस्य निवृत्त होणार आहेत. या सर्व सदस्यांचा २७ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यकाळ संपणार आहे.

अजित पवार गटातील इच्छुकांची यादी आली समोर

दरम्यान, अजित पवार गटाच्या वाट्याला विधान परिषद निवडणुकीत २ जागा आहेत. या दोन जागांसाठी राजेश विटेकर, सुरेखा ठाकरे, संजय दौंड इच्छुक आहेत. महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महादेव जानकर यांना दिली होती.

यामुळे त्या ठिकाणाहून इच्छुक राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तर या जागेसाठी संजय दौंड यांच्याकडूनही आग्रह करण्यात येत आहे. तर सुरेखा ठाकरे यांनी पक्ष संघटनेत सुरूवातीपासून काम करत असल्याने विधान परिषदेची मागणी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com