Rahul Gandhi: मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियांका गांधी लढवणार खासदारकीची निवडणूक

Rahul Gandhi To Keep Raebareli Seat: राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत घोषणा केली आहे.
Rahul Gandhi: मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका गांधी लढवणार खासदारकीची निवडणूक
Rahul Gandhi To Keep Raebareli SeatSaam Tv

प्रमोद जगताप, दिल्ली

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडला. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत घोषणा केली आहे. प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवणार आहेत. तर राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार आहेत. आज राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यासंदर्भात काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित होते. या बैठकीमध्येच राहुल गांधी वाडनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देण्यावर निर्णय झाला. तर राहुल गांधी हे रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक प्रियांका गांधी लढणार आहेत.

Rahul Gandhi: मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका गांधी लढवणार खासदारकीची निवडणूक
Amit Shah: 'जम्मू काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', दुसऱ्यांदा गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच अमित शहा अॅक्शन मोडवर

मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीनंतर सांगितले की, 'राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार आहेत. ते रायबरेलीचे खासदार राहतील. त्यांच्या जागी प्रियांका गांधी निवडणूक लढवणार आहेत.' त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत २ जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. रायबरेलीची जागा राहुल गांधींकडेच ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. प्रियांका गांधी वायनाडमधून रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लढवणार आहेत.'

Rahul Gandhi: मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका गांधी लढवणार खासदारकीची निवडणूक
Aadhaar Card Free Online Update: मोफत आधारकार्ड अपडेट करण्याची डेडलाइन वाढली, जाणून घ्या नवी तारीख

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले होते. विजयानंतर त्यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात त्यांनी लोकसभा सचिवालयाकडून कलम २४० (१) अंतर्गत राजीनामा देण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती मागवली होती. आता प्रियांका गांधी या लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यापूर्वीच दोन जागा जिंकल्यानंतर ते यूपीला प्राधान्य देतील, अशी चर्चा होती. रायबरेली हा त्यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. या जागेवरून सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीही खासदार झाल्या आहेत.

Rahul Gandhi: मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका गांधी लढवणार खासदारकीची निवडणूक
Sultanpur Viral Video: डोक्याला ताप! प्रेयसीला वाचवणाऱ्या प्रियकराला मच्छिमारांचा चोप; काय आहे प्रकार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com