Jalna News: अंगणवाडी सेविकेकडून पोषण आहार काळ्या बाजारात; ग्रामस्थांनी पकडला

अंगणवाडी सेविकेकडून पोषण आहार काळ्या बाजारात; ग्रामस्थांनी पकडला
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On: 

जालना : अंगणवाडीतील बालकांसाठी पोषण म्हणून शासकीय योजनेतून वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा (Poshan Aahar) काळा बाजार सुरू होता. चोरून हा माल बाजारात विक्रीसाठी नेला जात असताना (Jalna News) ग्रामस्‍थांनीच रंगेहाथ पकडला आहे. (Tajya Batmya)

Jalna News
Crop Insurance: पिक विमा कंपनीचे गौडबंगाल; एकाच गटातील दोन शेतकऱ्यांना विम्याची वेगवेगळी रक्कम

अंगणवाडीत आलेला पोषण आहारातील कडधान्य, डाळी आणि तांदूळ चोरून काळ्या बाजारात घेऊन जाताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना अंबड तालुक्यातील भांबेरी गावात घडली. सहा गोण्या तांदूळ आणि डाळी दुचाकीवरून दोन व्यक्ती घेऊन जात असल्याची बाब ग्रामस्‍थांच्‍या लक्षात आली. गावाकऱ्यांनी दुचाकी अडवून हा पोषण आहार पकडला आहे. विशेष म्हणजे (Anganwadi) अंगणवाडी चालक असलेल्या बकीता बेग हिनेच हा आहार या व्यापाऱ्याला विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Jalna News
kalyan News: भाजप- शिंदे गट शिवसेनेबाबत मनसे आमदाराचे मोठे विधान; म्‍हणाले शिवसेनेचाच उमेदवार राहणार

ग्रामस्‍थांनी दिली लेखी तक्रार

गावाकऱ्यांनी या बाबत तात्काळ सुपर व्हायझर आणि सिडिओला याबाबत लेखी तक्रार देखील दाखल केली. वरिष्ठांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होवून या पोषण आहाराचा पंचनामा करून कारवाईचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. मात्र संबंधित व्यापारी आणि अंगणवाडी चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com