Crop Insurance: पिक विमा कंपनीचे गौडबंगाल; एकाच गटातील दोन शेतकऱ्यांना विम्याची वेगवेगळी रक्कम

पिक विमा कंपनीचे गौडबंगाल; एकाच गटातील दोन शेतकऱ्यांना विम्याची वेगवेगळी रक्कम
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : मागील वर्षीच्या पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्याना अत्यल्प मोबदला मिळत आहे. (Nanded) नांदेडमध्ये तर पीक विमा कंपनीचा अजब कारभार सुरू असल्याचे उघड झाले आहे. एकाच गट क्रमांकाच्या शेतकर्यांना (farmer) कमी जास्त भरपाई म्हणून पीक विम्याची रक्कम देण्यात आली. (Latest Marathi News)

Crop Insurance
Jalgaon News: तापी नदीत उडी मारत वीटभट्टी मजुराने संपविले जीवन

गेल्या जुलै, ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. अनेक नदी नाल्याना पूर देखील आला होता. यात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. नांदेड जिल्ह्यात तब्बल ४३ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. शासनाकडून आणि पिक विमा कपन्यांकडून पंचनामे देखील झाले. डिसेंबरमध्ये २५ टक्के रक्कम म्हणून पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्याना पाच हजार देण्यात आले. नंतर दुसऱ्या टप्प्यात मात्र पिक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली. कोणाला कमी तर कोणाला नुकसानी नुसार भरपाई देण्यात आली.

Crop Insurance
Shahada News: प्रकाशा येथे पाणी प्रश्न पेटला; बीडीओ विरोधात नागरीकांचा मोर्चा

एकच पिकाचा विमा तरीही

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालु्क्यातील कोंढा या गावातील राजू कदम आणि सुरेश कदम हे दोघे सख्खे भाऊ आहेत. दोघांची शेती आजूबाजूला आहे. एकाच गट क्रमांकात या दोन भावाची शेती आहे. दोघांच्या शेतात फक्त धुरा आडवा आहे. अतिवृषटीमुळे दोघांच्या शेतातील प्रत्येकी एक हेक्टरमधील सोयाबीनचे नुकसान झाले. दोघांनीही पीक विमा (Crop Insurance) काढला होता. यानुसार दोघांनीही पीक विमा कंपनीकडे भरपाईसाठी दावा केला. पण राजू कदम यांना फक्त १७३ रूपये मिळाले आणि त्यांचे भाऊ सुरेश कदम यांना २६ हजार २५४ रूपये भरपाई मिळाली.

Crop Insurance
Jalgaon News: चैनपुलींगच्या प्रकरणात एकाच महिन्यात ३ लाखांचा दंड

कोंढा या गावात फक्त एकच प्रकार नाही. अतिवृषटीमुळे अख्या गावातील शेतीच नुकसान झाले. कोणाला एकरी ३८२ रूपये, कोणाला १ हजार २६८ तर अनेकांना एक हजाराच्या आतची रक्कम बँक खात्यात जमा झाली. शेतकऱ्याना दुसऱ्या टप्प्यात किमान २५ हजार रूपये मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु तुटपुंजी मदत मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com