Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार; १२३ गावाचा जनआक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून एल्गार

Jalna News : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार; १२३ गावाचा जनआक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून एल्गार
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On: 

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उद्या जालना (Jalna) आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या १२३ गावाच्यावतीने पुन्हा एकदा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले (Maratha Reservation) आहे. मराठा समाजाच्यावतीने या मोर्च्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation
Sambhajinagar News : धक्कादायक! विकत घेतलेला कट्टा चालवायचा कसा माहीत नाही; गोळी सुटली अन् अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कपाळात घुसली

मराठा आरक्षणासाठी अनेक वेळा आंदोलन करुन ही सरकार आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने व मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देण्यात यावं; या मागणीवर मराठा समाज आपल्या भूमिकावर ठाम आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणसाठी १२३ गावातील मराठा समाजाचा एल्गार पुकारला आहे. 

Maratha Reservation
Ahmednagar News: ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर; महिलेची रूग्णवाहीकेतच प्रसूती, नातेवाईक संतप्त

तगडा पोलीस बंदोबस्त 

मराठा आरक्षणासाठी उद्या पुन्हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने ही या मोर्च्याच्या पार्शभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त शहागड परिसरात तैनात केला आहे. आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा सामाज मोठ्या संख्येने एकवटणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com