Jalna News: मुलीचा खूनी बाहेरच; वडिलांनी पोलिस स्‍टेशनसमोरच अंगावर ओतले पेट्रोल

मुलीचा खूनी बाहेरच; वडिलांनी पोलिस स्‍टेशनसमोरच अंगावर ओतले पेट्रोल
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : मुलीच्या खून प्रकरणात आरोपीला पोलीस अटक करत नसल्याने फिर्यादीचा अंगावर पेट्रोल ओतून (Jalna News) जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सेवली पोलीस (Police) ठाण्यासमोर सदर घटना घडली आहे. मात्र पोलिसांकडून सदरील घटना दाबण्याचा प्रयन्त केला जात आहे. (Breaking Marathi News)

Jalna News
Kalyan News: ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा ठिय्या

जालना तालुक्यातील शंभु महादेव गावात पंधरा दिवसांपूर्वी एका विहीरीत तेरा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना २६ एप्रिलला घडली होती. या प्रकरणी मयत मुलीचे वडील मच्छिंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंधरा दिवस उलटूनही आरोपींना अटक केली नसल्यामुळे जाधव यांनी रविवारी (७ मे) दुपारी पोलिस ठाण्यासमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जणक घटना घडली.

Jalna News
Shirdi News: शिर्डीचा चेहरा मोहरा बदलणार; ५२ कोटींचा विशेष निधी मंजूर

व्हिडिओ व्‍हायरल झाल्‍याने घटना उजेडात

सदर प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात शुटींग घेतल्याने हा प्रकार समोर आला आहे. परंतु पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी फिर्यादी यांना पकडल्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला आहे. दरम्यान ही घटना सेवली पोलिसांनी दाबन्याचा प्रयन्त केल्याचा आरोपही केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com