Shirdi News: शिर्डीचा चेहरा मोहरा बदलणार; ५२ कोटींचा विशेष निधी मंजूर

शिर्डीचा चेहरा मोहरा बदलणार; ५२ कोटींचा विशेष निधी मंजूर
Shirdi News
Shirdi NewsSaam tv

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : साईबाबांच्या शिर्डी नगरीचा आता चेहरा मोहरा बदलणार आहे. देशातील विकसित देवस्थानांच्या धर्तीवर (Shirdi) शिर्डीच्या विकासासाठी राज्य सरकारने ५२ कोटी रूपयांचा विषेश निधी मंजूर केला असून येत्या दिड वर्षात शिर्डीचा कायापालट होणार आहे. (Maharashtra News)

Shirdi News
Nandurbar Accident News: भीषण अपघात; ट्रक-छोटा हत्तीची समोरासमोर धडक; ३ ठार, २ जखमी

राज्य सरकारने शिर्डीच्या सुशोभीकरणासाठी ५२ कोटीचा विशेष विकास आराखडा मंजूर केला असून आज महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शिर्डीत या विकास आराखड्याचे सादरीकरण केले आहे. वाराणसी, पुष्कर, तिरूपती बालाजी तसेच दांडी मार्चच्या धर्तीवर शिर्डीत वास्तुशिल्प तसेच साईबाबांच्या जिवनावर आधारित शिल्प देखील उभारले जाणार आहेत. शिर्डी परिक्रमा मार्गाचे सुशोभिकरण, मंदिरासमोरील नगर - मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजूला हजारो झाडे लावली जाणार आहेत. भक्तांना बसण्याच्या व्यवस्थेसह शिर्डीचे सुशोभीकरण होणार आहे.

Shirdi News
Kalyan News: ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा ठिय्या

शिर्डीत वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांबाबत विखे पाटलांनी चिंता व्यक्त केली. हे चित्र बदलण्यासाठी कठोर भूमिका घेणार असून शिर्डीची ओळख तीर्थक्षेत्र म्हणूनच व्हावी, तसेच शिर्डीचा विकास व्हावा; यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com