Manoj Jarange: मराठा विरोधकांना निवडणुकीत पाडा; मनोज जरांगे कडाडले, मतदारांना काय सल्ला दिला?

Manoj Jarange Voting News: मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत असं पाडा, की त्यांच्या पुढच्या पाच निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मतदारांना केलं आहे.
Manoj Jarange Health
Manoj Jarange HealthSaam TV

Manoj Jarange Latest News

मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत असं पाडा, की त्यांच्या पुढच्या पाच निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मतदारांना केलं आहे. निवडणुकीत आपले उमेदवार नसले, तरी पाडण्यातही आपला विजय असेल, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते.

Manoj Jarange Health
Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, राष्ट्रवादीकडून दोन नव्या नावांचा प्रस्ताव; शिंदे गटात धाकधूक

प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, आज परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान असल्याने जरांगे हे रुग्णवाहिकेतून त्यांच्या मूळ गोरी गंधारी या गावी आले होते. लोकशाहीचा हक्क बजावल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

'मराठा विरोधकांना निवडणुकीत पाडा'

माध्यमांसोबत संवाद साधताना जरांगे म्हणाले, "मी मराठा मतदारांना सांगितलं होतं की कुणालाही मतदान करा. कारण समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. सगेसोयरे अध्यादेशाच्या बाजूने आणि मराठा (Maratha) आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मराठा समाजाने सहकार्य करायला हवं".

"पाडण्यातही आपला विजय"

"जरी आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. उभाच राहावं किंवा उमेदवार द्यावा असं काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना", असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"आमचा करेक्ट कार्यक्रम केला"

"६ जूनच्या आत आरक्षण दिलं नाही तर आम्ही देणारे बनू विधानसभेच्या मैदानात मी सुद्धा असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते सारखेच आहेत असं माझा म्हणण्याचा अर्थ होता. पण या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला", असं देखील जरांगेनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत असं पाडा, की त्यांच्या पुढच्या पाच निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजेत.निवडणुकीत आपले उमेदवार नसले, तरी पाडण्यातही आपला विजय असेल, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मतदारांना केलं आहे.

Manoj Jarange Health
Amravati Lok Sabha: आनंदराज आंबेडकरांना नवनीत राणांकडून फंडिंग; काँग्रेसचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com