Amravati Lok Sabha: आनंदराज आंबेडकरांना नवनीत राणांकडून फंडिंग; काँग्रेसचा गंभीर आरोप

Amravati Election Voting LIVE: अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना फंडिंग केली, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
Amravati Lok Sabha Election 2024
Amravati Lok Sabha Election 2024Saam TV

Amravati Lok Sabha Election 2024 Voting LIVE

देशासह राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील ८ जागांवर मतदान पार पडत आहे. मतदानाच्या दिवशीच राजकीय नेते एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना फंडिंग केली, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.

Amravati Lok Sabha Election 2024
Amravati Lok Sabha Election: मोठी बातमी! अमरावतीतील तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांचा उपयोग केलेला आहे. त्यांना फंडिंग केलेलं आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या हॉटेलची बिलं देखील भरली आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी या आरोपांचं खंडण केलं आहे. यशोमती ठाकूर खूप सिनिअर असून त्या माझ्या नणंदबाई आहेत. मी माझ्या परिवाराचा नेहमी आदर करते. त्यांना जे काही म्हणायचं होतं, ते बोलून चुकलेल्या आहेत. त्यांच्या उमेदवाराला मी शुभेच्छा देते, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवर आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे. मी हॉटेलमध्ये राहत नसून बंगल्यामध्ये राहतो. त्या वेड्यासारखं बोलत आहेत. उलट यशोमती ठाकूर यांनी माझ्याकडून कडक नोटा घेतल्या असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे, असं म्हणत म्हणत आनंदराज आंबेडकर यांनी आरोपांचं खंडण केलं आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिलेला आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुब आणि रिपब्लिकन सेनेकडून आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचितने त्यांना पाठिंबा दिलेला आहे.

Amravati Lok Sabha Election 2024
Breaking News: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये तांत्रिक बिघाड; अमरावती, अकोला, वर्ध्यात मतदार ताटकळले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com