Jalna News: मराठा आरक्षण आंदोलन पेटलं; जालन्यात आंदोलकांनी बस पेटवली

Jalna News: पोलिसांनी आंदोलकांवर मारहाण केल्यानंतर जालन्यातील अंतरवालीमध्ये आंदोलकांनी बस पेटवल्याचा प्रकार समोर आली आहे.
Jalna News:
Jalna News: Saam tv
Published On

Jalna News In Marathi

जालन्यातील शहागड येथे पोलिसांनी मराठा आंदोलन चिघळल्याची माहिती समोर आली आहे . पोलिसांनी आंदोलकांवर मारहाण केल्यानंतर जालन्यातील अंतरवालीमध्ये आंदोलकांनी बस पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याचीही माहिती आहे. (Latest Marathi News)

जालन्यातील शहागड येथे मराठा आंदोलकांचं उपोषण सुरू होतं. यानंतर आज शहागड येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आंदोलकांनी पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जालन्यात आमरण उपोषण सुरू होतं.

Jalna News:
Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू होतं. आज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली. त्यानंतर आज जरांगे पाटील हे उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्याचवेळी आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली.

पोलिसांवर दगडफेक झाल्यावर त्यांनी प्रत्युत्तरात लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या, अशी प्राथमिक माहिती आहे. तसेच याच आंदोलकांनी बस देखील पेटवल्याची माहिती आहे.

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ उद्या नाशिक, बीडमध्ये आंदोलन

दरम्यान, जालन्यातील घटनेच्या निषेधार्ध उद्या नाशिक, नंदूरबार आणि बीडमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ उद्या नाशिकमध्ये निदर्शने करण्यात येणार आहे. तर मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Jalna News:
Jalna Protest Update: जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ; पोलिसांचा लाठीमार; झटापटीत ८ पोलिसांसह अनेक जखमी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आंदोलन केलं जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकचे समन्वयक आणि स्वराज्य पक्षाचे राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी माहिती दिली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बीड बंदची हाक दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com