Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Jalna Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
Cm Eknath Shinde on Maratha Reservation Protest
Cm Eknath Shinde on Maratha Reservation ProtestSaam Tv
Published On

Cm Eknath Shinde on Maratha Reservation Protest: जालन्यातील शहागड येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांनी आंदोलकांनावर लाठीमार केला आहे. तर याठिकाणी जाळपोळीची घटनाही घडली आहे. मात्र ही जाळपोळ कोणी केली, हे अद्याप स्पष्ट नाही. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळल्यानंतर पोलिस त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

Cm Eknath Shinde on Maratha Reservation Protest
Jalna Protest Update: जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ; पोलिसांचा लाठीमार; झटापटीत ८ पोलिसांसह अनेक जखमी

याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझी पर्वा फोनवर चर्चा झाली होती. जिल्हाधिकारी यांनीही घटनास्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, मनोज यांना मी सांगितलं की उपोषण करू नका. तुमच्या मागणीवर आपले अधिकारी काम करत आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी जे उपाय करायचे आहेत, ते सरकार करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका सरकारचीही आहे.

Cm Eknath Shinde on Maratha Reservation Protest
Police Custody: ताब्यात घेतल्यानंतर पोलीस मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या

मुख्यमंत्री म्हणाले की, ''झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या मागे पूर्ण सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही सरकराची भूमिका आहे. जो दुर्दैवी प्रकार घटना आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com