Police Custody: ताब्यात घेतल्यानंतर पोलीस मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या

Torture In Police Custody: ताब्यात घेतल्यानंतर पोलीस मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या
Can Police Torture In Custody
Can Police Torture In CustodySaam tv
Published On

Can Police Torture In Custody: 

देशात पोलिसांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील कायद्यांचे संरक्षण करण्यात पोलिसांची निर्णायक भूमिका असते. अशातच पोलीस हे देशातील कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पोलीस नसेल तर कोणत्याही देशाच्या आणि राज्याच्या प्रशासन व्यवस्थेची कल्पना करणे कठीण आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था नीट पाळली जात आहे का? त्यावर लक्ष ठेवणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र, अशी अनेक प्रकरणे देशात उघडकीस आली आहेत, जिथे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याला मारहाण केली. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...

Can Police Torture In Custody
Public Provident Fund scheme: सरकारी योजना PPF मध्ये गुंतवणूक केल्यास मिळत आहेत सर्वाधिक परतावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

सर्वातआधी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की ताब्यात घेणं आणि अटक यात काय फरक आहे? ताब्यात असलेल्या व्यक्तीला चौकशीसाठी काही तासांसाठी कारागृहात नेले जाते. (Latest Marathi News)

तर अटकेत असलेली एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास किंवा गुन्हा केल्याचा संशय असल्यास त्याला तुरुंगात पाठवले जाते. मात्र अटक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले जाते. या काळात त्याला चौकशीसाठी किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात पाठवले जाते.

Can Police Torture In Custody
SBI Best FD Schemes: एसबीआयच्या या दोन FD योजना आहेत जबरदस्त, गुंतवणुकीवर इतका मिळतो व्याजदर

आता प्रश्न असा आहे की, अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीला मारहाण करू शकतात का? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशही जारी केला आहे. जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेतल्यावर त्याला मारहाण केली, तर याला कस्टोडियन हिंसा, असे म्हटले जाईल. देशात ते बेकायदेशीर मानले जाते. न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलिसांना मारहाण करता येत नाही.

जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला मारहाण केली, तर अशा परिस्थितीत दंडाधिकारी पोलिसांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 अंतर्गत वॉरंट जारी करतात. दंडाधिकारी येथे अटक किंवा कारवाईचे आदेशही देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com