जालना : जालना शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबाराची घटना दुपारच्या सुमारास घडली. अर्जुन खोतकर यांचा खंदा समर्थक असलेल्या गजानन तौर या कार्यकर्त्यावर गोळ्या (Jalna) झाडण्यात आल्या (Crime News) असून यात दोन गोळ्या लागल्याने तौर यांचा मृत्यू झाला. प्रॉपर्टीच्या सुरु असलेल्या वादातून हत्या झाल्याची चर्चा शहरभर सुरु आहे. (Tajya Batmya)
जालना येथील गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने निघाले होते. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्या दिशेने गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या. यात दोन गोळ्या तौर यांना लागल्या. तर दोन गोळ्या चाटून गेल्या (Police) होत्या. त्यात तौर गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तौर याला तपासले असता मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नंतर शहरात एकच खळबळ उडाली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांकडून तपस सुरु
सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह पोलिसाच्या पाथकांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. तर तौर यांच्यावर इन कॅमेरा शवविच्छेद करण्याची मागणी करण्यात आल्याने मृतदेह छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. गजानन तौर हा अर्जुन खोतकर यांचा खंदा समर्थक असल्याने अनेक सामाजिक कार्यातही त्याचा सहभाग होता. यापूर्वी ही तौर यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल आहे. ही हत्या प्रॉपर्टी वादातून असलेल्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची चर्चा शहरभर सुरु आहे. या प्रकारणी पोलिसांनी पथक स्थापन करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.