Vidhan Sabha Election Result : जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीला धोबीपछाड; सर्व जागांवर महायुतीचा विजय निश्चित

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर झाला आहे. यात राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
Vidhan Sabha Election Result
Vidhan Sabha Election ResultSaam tv
Published On

जळगाव : राज्याची विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होती. महाविकास आघाडी व महायुती अशीच थेट लढाई पाहण्यास मिळत होती. जळगाव जिल्ह्यात देखील हेच चित्र पाहण्यास मिळत असताना आज जाहीर झालेल्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीला धोबीपछाड झाले असून महायुतीला सर्व जागांवर आघाडी असून विजय निश्चित मानला जात आहे.  

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर झाला आहे. यात राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात यंदा होत असलेली निवडणुकीत जनतेचा कल कोणाकडे असेल याबाबत चर्चा रंगत होत्या. अर्थात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट लढत सगळीकडे पाहण्यास मिळत होती. मात्र निकालानंतर महायुतीलाच स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पाहण्यास मिळत असून जळगाव जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती राहिली आहे. 

Vidhan Sabha Election Result
Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

भाजप, शिंदे गटाला ५-५ जागांवर विजय  

जळगाव जिल्ह्यात जागा वाटप करताना भाजपला ५, शिवसेना शिंदे गट ५ आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक जागा मिळाली होती. जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळाले आहे. अर्थात महायुतीने जिल्ह्यात दिलेल्या सर्व जागांवर विजय मिळविता आला आहे.  यात जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून भाजपचे सुरेश भोळे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मंगेश चव्हाण, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे, जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश महाजन, तर रावेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांना मागे टाकून आघाडी घेतली आहे. 

शिंदे शिवसेनेची एक जागा वाढली 
या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची एक जागा वाढली आहे. यात पारोळा- एरंडोल मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार अमोल पाटील यांनी दिग्गज शरद पवार गटाचे आमदार सतीश पाटील यांच्या विरोधात आघाडी घेतली आहे. अर्थात अमोल पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. याशिवाय जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील, पाचोरा- भडगाव मतदार संघातून शिंदेसेनेचे उमेदवार किशोर पाटील. मुक्ताईनगर मतदारसंघातून शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील, चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे यांनी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. अमळनेर मतदारसंघातून अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com