Bhusawal News : विजेचा झटका लागून वायरमन खांबावरून कोसळला; दुरुस्तीचे काम करताना घडली दुर्घटना

Jalgaon News : रोशन चौधरी हा बाह्यस्त्रोत कर्मचारी वायरमन नदिम बादशहा काझी (वय ३१) यांच्यासह खिडकी वाडा डिपीवर काम करीत होते.
Bhusawal News
Bhusawal NewsSaam tv
Published On

भुसावळ (जळगाव) : विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी वायरमन खांबावर चढला होता. काम करत असताना विजेचा जोरदार झटका बसून वायरमन खांबावरून खाली कोसळला. यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना वरणगाव येथे घडली. दैव बलवत्तर म्हणून तरुणाला केवळ दुखापत झाली आहे.

वरणगाव (Varangaon) येथे घडलेल्या घटनेत रोशन निवृत्ती चौधरी (वय ३०) हा गंभीर जखमी झाला आहे. रोशन चौधरी हा बाह्यस्त्रोत कर्मचारी वायरमन नदिम बादशहा काझी (वय ३१) यांच्यासह खिडकी वाडा डिपीवर काम करीत होते. यावेळी खांबावर काम करत असताना विद्युत प्रवाह बंद होता. मात्र इन्व्हर्टरच्या रिटर्न करंटचा जोरदार झटका (Electric Shock) रोशनला बसला. यामुळे खांबावरून खाली पडला. 

Bhusawal News
Dharashiv News : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी लाडक्या बहिणीचे तुळजाभवानीला साकडे

खांबावरून खाली पडल्याने रोशन चौधरी यांच्या उजव्या हाताला जबर मार लागून हात फॅक्चर झाला आहे. घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान वीज पुरवठा खंडित असल्यावर सुद्धा इन्व्हर्टरचा बॅक करंट खांबावर येत असतो. यामुळेच सदरची घटना घडली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com