Deepnagar Worker Strike: दीपनगर वीज प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दगडफेक; कर्मचाऱ्याच्या मृत्यूने आंदोलन

दीपनगर वीज प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दगडफेक; कर्मचाऱ्याच्या मृत्यूने आंदोलन
Deepnagar power project
Deepnagar power projectsaam tv
Published On

भुसावळ (जळगाव) : दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पात कामगारांना ३ ते ४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे. त्यात आता एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज (५ जानेवारी) दीपनगर (Deepnagar Power Project) प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करून मृत कर्मचाऱ्याच्या परिवारास भरपाईची मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्याने कर्मचारी संतप्त झाले. या वेळी पोलिसांनी (Police) लागलीच धाव घेत कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारासमोरून हटविले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (jalgaon news Throwing stones at the entrance of Deepnagar power project)

Deepnagar power project
Dhule BJP: भाजपकडून जितेंद्र आव्‍हाडांच्‍या प्रतिमेचे दहन

दीपनगर (Deepnagar) प्रकल्पात विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून आधीच कर्मचाऱ्यांचे आंदोलन (Deepnagar Worker Strike) सुरू होते. हे आंदोलन सुरू असतानाच एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूची वार्ता आल्यानंतर बुधवारी (ता. ५) सकाळी साडेदहाला आंदोलकांनी मोर्चा काढून नवीन ६६० प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नेला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले होते. दीपनगर प्रकल्पातील कर्मचारी शैलेंद्र यादव (वय ३४, मूळ रा. बिहार) हा इंडवेल कंपनीत काम करीत होता. आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी (ता. ४) रात्री त्याची प्राणज्योत मालवली. त्याचे निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह बिहारला (Bihar) त्याच्या गावाकडे रवाना करण्यात आला. मात्र नियमानुसार या कर्मचाऱ्याच्या वारसाला सर्व भरपाई देण्याची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

दीपनगरात कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अप्रिय घटना टाळण्यासाठी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे, तसेच कर्मचारी सुरक्षिततेबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास योग्य ती भरपाई द्यावी, तसेच मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह पुन्हा आणावा म्हणून कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला. चार तास होऊनही अधिकारी न आल्याने कामगार अधिकच संतप्त झाले व त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत भिमआर्मीने दगडफेकीच्या आरोपाचे खंडण केले असून, पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com