Jalgaon News Suicide Case
Jalgaon News Suicide CaseSaam tv

Jalgaon: वडीलांचे क्षणभर दुर्लक्ष अन्‌ तरूणाची आत्‍महत्‍या; कामाच्‍या ठिकाणीच घडला प्रकार

वडीलांचे क्षणभर दुर्लक्ष अन्‌ तरूणाची आत्‍महत्‍या; कामाच्‍या ठिकाणीच घडला प्रकार
Published on

जळगाव : हरीविठ्ठल नगरातील तरूणाने अनुराग स्टेट बँक कॉलनीत कामावर असतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news Today)

Jalgaon News Suicide Case
Dhule: भयंकर..जेवणासाठी पत्नीचा खून; प्रेमविवाहाचा झाला धक्कादायक शेवट

जळगावमधील (Jalgaon) हरिविठ्ठलनगरातील धीरज शिवाजी काळे (वय २१) असे मयत तरूणाचे नाव आहे. धीरज काळे हा आई– वडील आणि भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. भाऊ व वडीलांसोबत फर्निचरचे काम करून उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी (१४ जुलै) धीरज हा वडील ‍शिवाजी श्रावण काळे यांच्यासोबत अनुराग स्टेट बँक कॉलनी फर्निचरच्या कामाला गेला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडीलांचे लक्ष नसतांना एका खोलीत गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली. हा प्रकार उघडकीला आला.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पाटील व हरिश डोईफोळे यांनी घटनास्थळी गेले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात वडील शिवाजी श्रावण काळे, आई संगीता, भाऊ संदीप, मंगेश व विवाहित बहिण असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com