

जळगाव : येथील कांचननगर परिसरातील एका वृद्धाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना मंगळवारी (ता. १३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. टेबल फॅनमध्ये विद्युत प्रवाह उतरून (Electric Shock) त्यांना जोरात धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू ओढवल्याचे सांगण्यात आले. रतन निना साळुंखे (वय ७४, रा. कांचननगर) असे मृताचे नाव आहे. (Jalgaon News Electric Shock)
कांचननगरात (Jalgaon) रतन साळुंखे हे पार्टिशनच्या घरात एकटेच होते, तर त्यांचे कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या घराच्या जुन्या घरात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते पंखा सुरू करण्यासाठी उभे राहिले. पंख्याला हात लावताच त्यांच्या हाताला विजेचा जोरदार झटका लागल्याने ते पंख्यासह फेकले गेले. विजेचा धक्का इतका जबर होता, की खाली केासळल्यावरही त्यांच्या हाताला पंखा चिकटलेलाच असल्याने उजव्या हाताला जखम झाली आहे.
शेजारच्यांनी घेतली धाव
रतन साळुंखे यांच्या शेजाऱ्यांना कळताच त्यांनी मदतीला धाव घेतली. साळुंखे कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रतन साळुंखे यांना तातडीने (Medical Collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तपासनीअंती डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना असा परिवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.