'मिस यू ऑल' स्टेटस् ठेवत युवकाची आत्महत्या

'मिस यू ऑल' स्टेटस् ठेवत युवकाची आत्महत्या
Suicide Case
Suicide CaseSaam tv
Published On: 

सोलापूर : वर्षभरापुर्वी लग्‍न झाले. लग्न झाल्यानंतर वर्षभरातच पत्नीपासून विभक्त झाल्‍याने सतत नैराश्‍येत असलेल्‍या युवकाने टोकाचे पाऊल उचलले. मोबाईलवर मिस यु ऑल असे स्‍टेटस्‌ ठेवून आत्‍महत्‍या (Suicide) केल्‍याची घटना उघड झाली आहे. (Solapur News Suicide Case)

Suicide Case
घरच्यांनी केला प्रेमाला विरोध; प्रेमी युगुलांनी उचललं टोकाचं पाऊल, प्रीयसीचा मृत्यू तर प्रियकर...

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील हराळवाडीतील येथील सदर घटना आहे. अरुण येडवे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याची पत्नी बऱ्याच दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे तो काही दिवसांपासून तणावाखाली होता. पत्नीसोबत राहत नसल्याने नैराश्यातून युवकाने मोबाइलवर 'मिस यू ऑल ऑफ यू'चा मेसेज स्टेटसला ठेवत गाव शिवारात शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

विहिरीत आढळला मृतदेह

या घटनेनंतर मयत अरुण याचा भाऊ रवींद्र येडवे यांनी कामती पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्याचा मृतदेह गावालगत प्रभाकर शेळके यांच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.